jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

Department Information

Cultural Department

Dr. Varsha S. Phatak
Mr. Vikas Shringare
Dr. Pratap Naikwade
Mr. Sunil Sonawane
Mrs. Madhuri Joshi
Mr. Ajinkya Naphade
Mrs. Punam Bhopalakar

Activities

युवा महोत्सव अहवाल 2017-2018

मुंबई विद्यापीठ आयोजित ५०व्या युवा महोत्सवात आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एकूण ५१ विद्यार्थी व सहकलाकार ३२ कलाप्रकारांमध्ये सहभागी झाले. दिनांक ११ ऑगस्ट २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे ही स्पर्धा संपन्न झाली येथे झालेल्या स्पर्धेत एकूण २६ कलाप्रकारांपैकी १८ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे

 • मराठी एकांकिका - प्रथम क्रमांक
 • हिंदी एकांकिका - प्रथम क्रमांक
 • समूह गीत - प्रथम क्रमांक
 • एकपात्री हिंदी - प्रथम क्रमांक
 • कोलाज - प्रथम क्रमांक
 • कार्टूनिंग - प्रथम क्रमांक
 • मेहंदी - प्रथम क्रमांक
 • रांगोळी - प्रथम क्रमांक
 • क्ले मॉडेलिंग - प्रथम क्रमांक
 • लोकनृत्य - द्वितीय क्रमांक
 • एकपात्री मराठी - द्वितीय क्रमांक
 • पोस्टर मेकिंग - द्वितीय क्रमांक
 • ऑन द स्पॉट पेंटिग - द्वितीय क्रमांक
 • तालवाद्य - द्वितीय क्रमांक
 • स्कीट - तृतीय क्रमांक
 • सुगम गायन - तृतीय क्रमांक
 • शास्त्रीय गायन -- तृतीय क्रमांक
 • वादविवाद - तृतीय क्रमांक

रत्नागिरी.सिंधुदुर्ग,व रायगड विभागाअंतर्गत रत्नागिरी येथील सावरकर नाट्यमंदिर येथे झालेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘डू ऑर ड्राय’ या एकांकिकेस तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक प्राप्त झाला. या एकांकिकेत कु. ओंकार चेंदूलकर, प्रशांत धामणस्कर, जगदीश गोरुले, मनीष साळवी, मनीष कदम, प्रथमेश गुडेकर, सुमेध कांबळे, हर्षदा शेळके,पूजा बोथरे, प्रीती शिंदे, रविना लिंगायत, निकिता जाधव असे एकूण १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. या एकांकिकेचे लेखक मनीष साळवी यांस उत्कृष्ट लेखनाचे वैयक्तिक पारितोषिक प्राप्त झाले. या एकांकिकेचे नेपथ्य व प्रकाशयोजना साईप्रसाद शिर्सेकर यांनी केले. सदर एकांकिकेची अंतिम फेरी डिसेंबर महिन्यात पुणे येथे होणार आहे.

मुंबई विद्यापीठ आयोजित ५०व्या युवा महोत्सवातील अंतिम फेरीत खालील कलाप्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. १. समूह गीत ब्रांझ पदक २. रांगोळी सुवर्ण पदक ३. इंस्टोलेशन ब्रांझ पदक ४. ऑन द स्पॉट पेंटिंग रौप्य पदक ५. मेहंदी उत्तेजनार्थ राष्ट्रीय पातळीवर कु. विलास विजय रहाटे या प्रथम वर्ष कलाच्या विद्यार्थ्याची मुबई विद्यापीठ संघामध्ये निवड झाली.
Achievements

Gallery

Gold winner rangoli made by Mr Vilas Rahate
Gold winner rangoli.
Installation Bronze Medal Winner Group