jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

वार्षिक स्नेहसम्मेलन

Date : 2020-01-07
विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापन कार्यासोबत स्वत:मधील कला- कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असते ते म्हणजे वार्षिक स्नेहसम्मेलन. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसम्मेलन म्हणजे विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, वैशिष्ट्यपूर्ण दिवसामुळे विविध पेहराव हौस मौज, प्रथा परंपरा टिकवण्याचा केला जाणारा प्रयत्न, ही सर्व मनोरंजनाची पर्वणीच असते. मनोरंजनातून विद्यार्थ्यांना आनंद द्विगुणित करण्यासाठी फनीगेम्स, व फिशपॉंन्ड कार्यक्रम महत्वपूर्ण असतात. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसम्मेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात फनीगेम्स च्या उद्घाटनाने झाला.