jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी संपन्न

Date : 2020-02-10
पदवी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील सर्व पदवीधर विद्यार्थी या समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा संशोधन केंद्राचे वैज्ञानिक डॉ. बबन इंगोळे उपस्थित होते, त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष सदानंदजी भागवत, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. तेंडोलकर, मा. उपप्राचार्य प्रा. संजय टाकळकर, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. .