jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

महाविद्यालयाच्या वतीने भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Date : 2020-02-08
आठल्ये सप्रे पित्रे, देवरुख महाविद्यालयाच्या वतीने भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष सदानंद जी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहन कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उदेशिका यांचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याशिवाय शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. .