jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Date : 2020-03-01
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्त साधून २९ फेब्रुवारी २०२० रोजी संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धा, मोडेल मेकिंग स्पर्धा तसेच शाश्वत विकासासाठी विकास या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर या विद्यार्थ्यांकरिता विज्ञानातील विविध प्रयोगसुद्धा दाखविण्यात आले महाविद्यालयातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र , वनस्पतीशास्त्र व संगणकशास्त्र या प्रयोगशाळांमध्ये विज्ञानावर आधारित वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यानी सादर केले. कार्यक्रमासाठी संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांमधून एकूण ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते.