jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून दरवर्षी दिला जाणारा “आदर्श ग्रंथालय वापरकर्ता पुरस्कार (Best Library User Award)” मान्यवरांच्या हस्ते वितरित

Date : 2020-03-03
अलीकडे खरोखरच वाचन हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे. या वास्तवाचा विचार करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची मनापासून आवड व गोडी निर्माण व्हावी तसेच ग्रंथालय सेवा सुविधांचा अधिकाधिक वापर व्हावा या हेतूने ग्रंथालयाकडून मागील तीन वर्षापासून काही निकषांच्या आधारे ‘Best Library User Award’ या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यासाठी विद्यार्थ्यानी संपूर्ण वर्षभरात अभ्यासक्रमा व्यतिरिक्त वाचलेली एकूण अवांतर पुस्तके व त्यांचे पुस्तक परीक्षण याशिवाय ग्रंथालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग, मिळविलेले प्राविण्य व त्यांचे एकूणच ग्रंथालयाप्रती समर्पण गृहीत धरून हा पुरस्कार दिला जातो.. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षाकरिता तीन विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची अनुक्रमे पहिली, दुसरी व तिसरी मानकरी ठरली ती तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थीनी कु. वेदिका सुनीलदत्ता राजवाडे. (TYBCOM), दुसरी मानकरी ठरली आहे ती द्वितीय वर्ष विज्ञान विभागातील विद्यार्थीनी कु. नेहा विजय सावंत. (SYBSC) व तिसरी मानकरी ठरली ती द्वितीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थीनी कु. श्वेता सुनील जाधव॰ (SYBCOM) या तिन्ही विद्यार्थिनिना प्रमुख अतिथि मा. प्रकाशजी देशपांडे, अध्यक्ष -लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांच्या हस्ते पुस्तक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.