jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

महाविद्यालयातर्फे स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Date : 2020-03-05
आजच्या युगामध्ये बी.ए./ बी.कॉम./बी.एस्सी. पदवी घेऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अनेक सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु सर्वांकरीता स्पर्धात्मक परीक्षा देणे अनिवार्य असते. विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांची कल्पना यावी याकरिता महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा व ग्रंथालय विभागामार्फत दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी बहूपर्यायी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला एकूण ८४ विद्यार्थी बसले होते. या स्पर्धेमध्ये कु. रत्नदीप डावल (एस.वाय.बी.कॉम ), कु. विश्वजित मावलनकर (एफ.वाय.बी.एससी.-सी.एस) , कु. सुलोचना प्रभू (एम.एस.सी.- फिज़िक्स-I)., कु. मोहित तेंडोलकर (एफ.वाय.बी.एससी.-सी.एस), कु . चैतन्या भागवत (एस.वाय.बीएससी. ) यांनी अनुक्रमे पहिला, दूसरा, तिसरा व उत्तेजनार्थ असे क्रमांक प्राप्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्रा. मा. तेंडुलकर यांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. चणय्या हिरेमठ, प्रा. विकास शृंगारे , प्रा. धनंजय दळवी , ग्रंथालय सहाय्यक- स्वप्नील कांगणे, शिपाई, अमोल वेलवणकर यांनी मेहनत घेतली.