jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

सांस्कृतिक उपक्रम मार्गदर्शनपर राज्यस्तरीय कार्यशाळा

Date : 2020-12-03
विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण युवा महोत्सवाच्या माध्यमातून वक्तृत्व, वादविवाद, गायन, वादन, नाट्य, नर्तन, फाईन आर्ट्स अशा विविध प्रकारच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागी होत असता. आपली कला वा आपला विषय उत्स्फूर्तपणे मांडून पारितोषिक प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करता. तसेच उपरोक्त कौशल्ये आत्मसात करण्याची आवडही तुम्हाला असते. या गोष्टी लक्षात घेऊनच आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरुख, सांस्कृतिक विभाग काही कलांचे उत्तम मार्गदर्शन करणारी राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यशाळा आयोजित करीत आहे. सदर कार्यशाळा प्रत्येक सादरीकरण कलेचे मार्गदर्शन करणारी, एक तास कालावधीची व एक दिवसीय असेल. नामवंत निवेदक, मार्गदर्शक व नाट्यअभिनेत्री या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करतील. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. ज्या विद्यार्थ्याला ज्या कलेची आवड असेल त्याला त्या कार्यशाळेत भाग घेता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला सर्वच कार्यशाळांमध्ये सहभागी व्हायचे असेल तरी त्याला प्रथम नोंदणी प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश दिला जाईल. तरी इच्छुक विद्यार्थ्यानी कार्यशाळेत प्रविष्ट होण्यासाठी लिंकवर खाली दिलेला नोंदणी अर्ज (रजिस्ट्रेशन फॉर्म) दिनांक १० डिसेंबर २०२० पर्यन्त भरून पाठवावा. विषय- मुलाखत कौशल्ये मार्गदर्शक- प्रा. डॉ. नीतिन आरेकर, मराठी विभाग प्रमुख , सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर, पटकथा लेखक व निवेदक
दिनांक - शनिवार १२/१२/२०२० वेळ - ११.०० ते १२.०० नोंदणी लिंक - https://forms.gle/9PwhVgikXezqa9K27
विषय- वक्तृत्व व वादविवाद (माध्यम- इंग्लिश) मार्गदर्शक- जेनिफर गाडगीळ , शिक्षिका व तज्ज्ञ मार्गदर्शक, मुंबई दिनांक - सोमवार -१४.१२.२०२० - मंगळवार १५.१२.२०२० वेळ - ११.०० ते १२.०० नोंदणी लिंक - https://forms.gle/cB5wapsK7yQY3nAq8
विषय- नाट्यअभिनय/ वक्तृत्व व वादविवाद (माध्यम मराठी) मार्गदर्शक- डॉ. स्वराली शिंदे, प्राध्यापिका, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी, नाट्य अभिनेत्री डॉ. शीतल पावसकर , प्राध्यापक, आरकेटी महाविद्यालय, मुंबई दिनांक - बुधवार १६.१२.२०२० वेळ - ११.०० ते १२.०० नोंदणी लिंक - https://forms.gle/Lsq6gksU4NcHrajP9
अधिक माहितीसाठी संपर्क – प्रा. डॉ. वर्षा फाटक -९४०५०६९२४६ प्रा. अजित जाधव- ९८६०७६७९२८ श्री. सुभाष मायंगडे ९८६०५७२७९७ # सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रशस्तिपत्रके देण्यात येतील . # कार्यशाळेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. # स्त्रोत- गूगल मीट लिंक


Brochure