कारगिल युद्ध ३ मे ते २६ जुलै १९९९ या कालावधीत लडाख जिल्ह्यातील द्रास, कारगिल या ठिकाणी झाले होते.दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वांत उंचीवरच्या भूमीत लढल्या गेलेल्या युद्धाला आणि त्यात मिळविलेल्या नेत्रदीपक विजयाला यावर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
प्राणांची बाजी लावून भारतीय जवानांनी या युध्दात २६जुलै १९९९ रोजी विजयश्री खेचून आणली आणि ऑपरेशन विजय यशस्वी झाले. हा शुभदिन सर्व देश कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा करतो.
देशांच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी अहोरात्र धीरोदात्तपणे लढणाऱ्या सैनिकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण राहावे म्हणून यानिमित्ताने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने परमवीर चक्र विजेत्या सैनिकांचे योगदान या विषयावर आधारित ऑनलाईन परमवीर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे.
तरी दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमींनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन प्रश्नमंजुषा सोडवावी.
या ऑनलाइन स्पर्धेची लिंक 12 ऑगस्टला सकाळी पाठवण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
आयोजक: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, देवरुख