देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. नीलम नारायण आखाडे यांना सेट परीक्षेतील यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नीलम आखाडे यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून ‘ए’ ग्रेड मधून उत्तीर्ण केले आहे. नीलम यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा,आंबवली(धनगरवाडी) येथे, तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण गुरुवर्य काकासाहेब सप्रे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यांचे वडील नारायण आखाडे जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असून, आई सौ. सुवर्णा या गृहिणी आहे.
नीलम आखाडे भौतिकशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महाविद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. त्यांना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. डॉ. मीरा काळे, प्रा. उदय भाट्ये, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा.पुष्कर पाटकर आणि ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
प्रा. आखाडे यांनी प्राप्त केलेल्या यशासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
E-papers Link: https://dakhalnewsmaharatshtra.com/?p=13526