Award of Autonomous Status by UGC, New Delhi (2019-20) | Star Education Award- 2023 | Best College Award- 2009-10 | Best Principal Award- 2022 | NAAC Accredited ‘A’ Grade (Third Cycle-2015-16) | Best College NSS Unit Award by MU (2015-16, 2022-23)| Jagar Janivancha Award (2012-13, 2013-14)

Devrukh Shikshan Prasarak Mandal’s

NYA. TATYASAHEB ATHALYE ARTS, VED. S. R. SAPRE COMMERCE &
VID. DADASAHEB PITRE SCIENCE COLLEGE, DEVRUKH (AUTONOMOUS)

Late Kakasaheb Pandit Educational Complex, Devrukh,
Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri – 415 804 ( Maharashtra, India)

देवरुख महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार

 

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या तीन पुरस्कारांमध्ये महाविद्यालयाला ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार’, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनिल रत्नाकर सोनावणे यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार’ आणि कु. जानवी रणधीर शिंदे या विद्यार्थिनीला ‘राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

▪️राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या तीन पुरस्काराच्या निकषासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षात मुंबई विद्यापीठ, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत निर्देशित केलेले उपक्रम व त्यांची अंमलबजावणी, तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांच्या आधारावर हे पुरस्कार मुंबई विद्यापीठांनी बहाल केले आहेत.

▪️महाविद्यालयाला यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करीता ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार’, तसेच प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाला होता.

▪️महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनावणे आणि विभागातील कार्यरत प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे आणि प्रा. पिया मोरे यांना सन्मानित केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मिळालेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड वेदा प्रभुदेसाई, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Samana Marathi Newspaper- Ratnagiri dated 21st August 2024

E-papers News Link:

https://digikokan.com/devrukh-college-received-three-awards-from-the-department-of-national-service-scheme-university-of-mumbai/kokan/

https://ratnagiri24news.com/devrukh-college-received-three-awards-from-the-department-of-national-service-scheme-university-of-mumbai/

https://www.graminvarta.in/?p=17733