भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने पुस्तक परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले पुस्तक परीक्षण १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जमा करावेत.
स्पर्धेचे नियमः
- कोणत्याही एका मराठी पुस्तकाचे परीक्षण करावे. यामध्ये चरित्र-आत्मचरित्र, कथा, कादंबरी व प्रेरणात्मक पुस्तकांचे परीक्षण करू शकता.
- स्पर्धेचे माध्यमः मराठी, हिंदी किंवा इंग्रजी पैकी कोणतेही
- परीक्षण शब्द मर्यादा १०००-१५०० शब्द
- परीक्षण हस्ताक्षरात किंवा google/Unicode font मध्ये टाइप करून देऊ शकता.
- आपले परीक्षण दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त ग्रंथालयात जमा करावेत.
- प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ प्राप्त विद्यार्थ्यांना आकर्षक परितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
- सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
- अधिक माहिती करिताः ग्रंथपाल श्री. सुभाष एस. मायंगडे मोब. नं. ९८६०५७२७९७ प्रा. अजित ज. जाधव (मराठी विभाग) मोब. नं. ९८६०७६७९२८