देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवातील विविध सांस्कृतिक कलाप्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वर्गीय स. का. पाटील सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. ओंकार पारकर यांनी केले.
■ प्रा. धनंजय दळवी यांनी ५६व्या व ५७व्या युवा महोत्सवात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.
■ यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले मुंबई विद्यापीठाचे फाईन आर्टचे सर्वसाधारण विजेतेपद, महाविद्यालयाला लोकनृत्य प्रकारात प्राप्त झालेला विशेष चषक, तसेच राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात महाविद्यालयाच्या अक्षय शिवाजी वहाळकर आणि सुयोग चंद्रकांत रहाटे यांनी मिळवलेले यश. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. विलास रहाटे यांनी मुंबई विद्यापीठाचे मार्गदर्शक म्हणून मिळवलेले यश यांचा समावेश होता.
■ सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी आणि त्यांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धा पुढील प्रमाणे:- शैक्षणिक वर्ष: २०२४-२५ मधील ५७ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग- १० मध्ये महाविद्यालयाने यशस्वी कामगिरी करून अंतिम स्पर्धेसाठी १४ कला प्रकारात प्रवेश प्राप्त केला आहे.
यातील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणेः
■ १. भारतीय सुगम संगीत- ब्रिद संस्कृती- प्रथम.
■ २. लोकनृत्य- सहभाग १० कलाकार- प्रथम.
■ ३. कार्टूनिंग- रहाटे सुयोग- *प्रथम
■ ४. कोलाज- रहाटे सुयोग- द्वितीय.
■ ५. क्ले मॉडलिंग- रहाटे सुयोग- तृतीय.
■ ६. मेहंदी- शिंदे सिद्धी व सुर्वे वैष्णवी- द्वितीय.
■ ७. पोस्टर मेकिंग – मोवळे साहिल – द्वितीय.
■ ८. रांगोळी – शिवगण सायली- कन्सोलेशन.
■ ९. कथाकथन (मराठी)- चव्हाण श्रुती- द्वितीय.
■ १०. एकपात्री अभिनय (हिंदी)- साळवी वैष्णवी – द्वितीय.
■ ११. एकपात्री अभिनय (मराठी)-खेडस्कर साहिल – द्वितीय.
■ १२ शास्त्रीय नृत्य- अवसरे शर्वरी- द्वितीय.
■ १३. कथाकथन (हिंदी)- चव्हाण तनया- तृतीय.
■ १४. मिमिक्री- गवंडी साक्षी- कन्सोलेशन.
■ ५६व्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील लोकनृत्य प्रकारासाठी महाविद्यालयाला ‘श्रीमती इंदुमती लेले पुरस्कार’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये साक्षी गवंडी, साक्षी बडबे, साक्षी कांबळे, आकांक्षा ननावरे, प्रीती पाष्टे, नम्रता नलावडे, वैष्णवी भोसले, सायली मोरे आणि मार्गदर्शकांना समावेश आहे.
■ ५६व्या युवा महोत्सवातील ‘फाईन आर्टचे (उपयोजित कला)’ स्वर्गीय गणेश प्रभाकर गांगल चषक महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करून देण्यात यशस्वी झालेल्या सुयोग रहाटे, अक्षय वहाळकर, सिद्धी शिंदे, आणि मार्गदर्शकांना सन्मानित करण्यात आले.
■ मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षय वहाळकर व सुयोग रहाटे यांना इंद्रधनुष्य राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील उत्तम कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे फाईन आर्टचे मार्गदर्शक श्री. विलास रहाटे यांनाही सन्मानित करण्यात आले.
■ प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना फाईन आर्ट प्रकारात महाविद्यालयाने मिळवलेल्या नावलौकिक अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. कोणत्याही कलेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कायम वाचन, सराव, निरीक्षण, मनन व चिंतन करण्याबाबत आग्रही मत व्यक्त केले.
■ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. विकास शृंगारे यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य सरदार पाटील, प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे, मार्गदर्शक, विद्यार्थी व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
■ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, अड. वेदा प्रभुदेसाई यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.