देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर, दिनांक १९ व २० सप्टेंबर, २०२४ रोजी आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा ही महाविद्यालयामध्ये प्रथमच होत असून, महाविद्यालयाच्या सुलभाताई आपटे क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे.
आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व कोकण या चार विभागांतील विद्यार्थी आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी उपस्थित राहणार आहेत.
सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी तांत्रिक सहाय्य संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई आणि सहकारी यांचे लाभणार आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शन व नियोजना नुसार उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, जिमखाना समन्वयक प्रा. डॉ. अमित वराळे आणि सहकारी प्राध्यापक मेहनत घेत आहेत.