कारगिल युद्ध ३ मे ते २६ जुलै १९९९ या कालावधीत लडाख जिल्ह्यातील द्रास, कारगिल या ठिकाणी झाले होते.दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वांत उंचीवरच्या भूमीत लढल्या गेलेल्या युद्धाला आणि त्यात मिळविलेल्या नेत्रदीपक विजयाला यावर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
प्राणांची बाजी लावून भारतीय जवानांनी या युद्धात 26 जुलै 1999 रोजी विजयश्री खेचून आणली आणि ऑपरेशन विजय यशस्वी झाले. हा शुभदिनी सर्व देश ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा करतो.
देशांच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी अहोरात्र धीरोदात्तपणे लढणाऱ्या सैनिकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण राहावे म्हणून यानिमित्ताने ‘परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची शौर्यगाथा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे
1. वक्तृत्व स्पर्धेचा विषय:- परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची शौर्यगाथा
2. वेळ 5 ते 7 मिनिटे
3. स्पर्धा दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता कै. द. ज. कुलकर्णी सभागृहात होईल.
4. इयत्ता 10वी ते 15 वी तील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकतात.
5. जे विद्यार्थी सदर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपली नावे शाळेचे नाव व इयत्तेसह खालील नंबरवर पाठवावीत.
6. विजेत्यांना आकर्षक बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाईल.
7. वक्तृत्व स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा. अजित जाधव 986-076-7928 वा श्री.सुभाष माईंगडे- 9860572797 यांचेकडे नोंदवावीत.
आयोजक: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय,देवरुख