कोणत्या प्रकारची पुस्तके आपण ग्रंथालयास देणगी म्हणून देऊ शकता?
- जुनी किंवा नवीन, सुस्थितीत असलेली दर्जेदार पुस्तके (ग्रंथालयासाठी उपयुक्त).
- नावाजलेल्या लेखकांची अवांतर वाचनाची पुस्तके. उदा. कथा, कादंबरी, प्रवास वर्णने, चरित्रे- आत्मचरित्रे इत्यादी..
- शैक्षणिक आणि मार्गदर्शक पुस्तके (स्पर्धा परीक्षांसाठी).
- व्यक्तिमत्व विकास, नोकरी मार्गदर्शन, तसेच प्रेरणादायी विषयांची पुस्तके.
- विज्ञान, इतिहास, तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील पुस्तके
कृपया तुमचे देणगी स्वरूपातील दर्जेदार पुस्तके आजच आमच्या ग्रंथालयात जमा करा आणि या कार्यात सहभागी व्हा.
टीप: देणगी स्वरूपातील पुस्तकांचे परीक्षण ग्रंथालय सल्लागार समितीमार्फत करण्यात येईल, आणि उपयुक्त असे दर्जेदार पुस्तकेच ग्रंथालयात दाखल करण्यात येतील.
दिनांक : ०९- १५ ऑक्टोबर २०२४ सकाळी १०:३०-५.०० वाजेपर्यंत स्थळ : ग्रंथालय, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख
धन्यवाद !
Read Notification Click Here